शिशिरागम

मर्ढेकरांची कविता / शिशिरागम

By admin, 30 December, 2023

आता अंत कशास पाहसि ! अता आभाळलें अंतरीं;
विश्वाची घटना मला न उमगे; मानव्यता दुर्बळ.
केलें पाप असेल जे कधिं तरी मी जन्मजन्मांतरी,
प्रायश्चित्त तदर्थ ना म्हणुनि गा, पाठीवरी हे वळ ?
न्यायाच्या निज मंदिरांत बसुनी साक्षीपुराव्याविना,
किंवा काय गुन्हा असेल घडला सांगितल्यावाचुन,
न्यायाधीश असेल मानव तरी शिक्षा सुनावीत ना;
देवाची परि न्यायरीति असलें पाळील का बंधन !
होवो तृप्त - तथास्तु! -निर्घुण प्रभो ही न्यायतृष्णा तुझी;
फासाला चढल्यावरी नच दया याची, जरी पामर;
भूतां अप्रतिकारिता भ्रमविते यंत्रापरी शक्ति जी,

By admin, 30 December, 2023

हां हां थांब ! नको सुहास, गमवू तोंडांतली मौक्तिकें,
"देवाच्या घरचाच न्याय असला !" प्रश्नास दे उत्तर.
"झाला खेळ, अता पुरे!" वद असे धिक्कारुनी कौतुकें,
जातांना उपहास हास्य-ध्वनिही पाडीत कानांवर.
काळी भीषण रात्र कापित निघे हृत्स्वामिनी भेटण्या
काळा फत्तर तोंच होउनि पडे तारा सहाऱ्यावर.
स्वर्गाच्या मग मंदिरी चमकती जेव्हा सख्या चांदण्या,
किंचित् हासुनि तारका खुणविते-"आता कळे अंतर!"

झाला अंक समाप्त एक ! बदले ही भूमिका, वेष हा;
मी रस्त्यांतिल गे भिकार कवि, तूं प्रासादशृंगी रहा!

By admin, 30 December, 2023

सुन्न झालें मन, सुन्न भावना या,
भोवताली पसरली रात्र-छाया;
पावसाचा चुकविण्या मार घेती
पांघरूनी अंधार घरें रस्तीं.
“-व्यर्थ येतां का ? प्रेम कधी माझें
-शक्य नाही " -उतरिलें तिथे ओझें
बंद दाराशीं मग मुग्ध भावनांचें;
आणि धरिला मम मार्ग सिधा....
पावसाळी अंधार-गारठ्यांत
काकडूनी हम-मार्ग-दिवे जात;
चिंब ओला जाहलों आणि थेट
दारुगुत्त्याला दिली प्रथम भेट !
भेट शेवटली तशी प्रथम तीच,
झोपडीला परतवी माय-खेच.
माय असते, बाईल जरी नाही,
प्रेमवंतां तशि प्रेमवंचितांही.
दिवस झाले कित्येक त्या प्रसंगा;
आज आलों शोधीत गेह-रांगा;

By admin, 30 December, 2023

कोणी नको अन् कांही नको, देवता तू एकली !
हृदय जीतें अर्पिल हे होउनी बद्धांजली !
वाटभर गे हा फुपाटा; पाय जाती पोळुनी;
सौंदर्य तूझें - सावली ही ! सार्थ झाली चालणी.

आग पोटीं भावनेची ! 'घाल तुकडा भाकरी',
-हीहि परिगे, याचना ना आज तूझ्या मंदिरीं.
मन्मनाच्या माळरानी भावना-झुडुपें जिथे
तग न धरिती, प्रेम-तरुगे, फोफावणें कैचा तिथे !
जीविताचे ऊन विश्वी जोंवरी हें तापतें,
फक्त तूझ्या दर्शनाची ही पिपासा लागते.

सौंदर्य-देवी सुहास तूं ! मी फक्त आतुर दर्शना;
मेल्यावरी तर हीहि गे, उरणार नाही तहान ना !

By admin, 30 December, 2023

दिव्यात्म प्रस्फूर्त हृद्गीत हें गोड गाईल कोणास गुंजारवीं ?
आवेगुनी अंतरीचा उमाळा दाटून येतां कुठे ओतणें !
उत्पल हृत्पुष्प ! आशादळांचा खुले रंग ! भोळी चढे टवटवी !
तत्केसरांच्या सुबासी परागां कुणां केस-भांगांतुनी पेरणें
उत्तुंग लाटा समुल्लोलुनी या सुहृत्सागराच्या नभीं चालल्या;
ही फेनमाला स्वर्गस्थिता कोण घेईल का तारका झेलुनी ?
मज्जीवनाच्या पहाटेस वृत्ती मनींच्या अशा तीव्र आतूरल्या
शोधार्थ अदृष्ट रूपा ! म्हणूनी किती भागलों वाट ही चालुनी !
कुणी हासलीं; रम्य गोष्टी कुणांच्या; कुणी स्पर्शुनीं अंग बेहोषवी;

By admin, 30 December, 2023

गुलाब, जाई फुललेली । वाऱ्यावर करिती केली;
हास गडे त्यांच्यासंगें । सुमहृदया माला तूं गे;
नयनामधि निर्मल पाणी । सस्मित मधु अधरीं गाणी;
गात गात आनंदूनी । नंदनवन बनवी अवनी.

मिटलेल्या कोमल कलिका । पानांमधि लपवी लतिका;
एकेकिस शोधुनि काढी । चुंबुनि ती फुलवी वेडी,
- हात नका लावू कुणिही । कोमेजुन जातिल बाई;
शब्द नका काढू कुणिही । लपविल ही नाजुक जाई.

सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती;
मंद गंधभवती भरती । पानपुष्प पुलकित करिती.
वर्षांच्या मागुनि वर्षे । जातिल तरि विसरुनि हर्षे;
पाहत तुज राहिन ऐसा । आनंदित वेडा जैसा.

By admin, 30 December, 2023

वाचन-मग्ना पर्णकुटीच्या दारिं उभी टेकुनी,
कपोला अंगुलिवर ठेवुनी.

सडा शिंपुनी प्रातःकाळी, सुंदर संमार्जुनी,
काढली रांगोळी अंगणी.
कडेकडेने गुलाब फुलला टपोर कलिका किती
लाजुनी अर्ध्या तुज हासती.
बाल हरिण तव धावत येतां अनिमिष बघ लोचनी
राहिला पाहत तुज थबकुनी.
तिरपा डोंगर-कडा भयंकर सरळ तुटे खालती,
मागुनी सूर्यकिरण फाकती.
झाडावरलें पान हलेना, स्थिरचर संमोहुनी
जाहले मग्न तुझ्या चिंतनी

पवनीं भरल्या अलकसुगंधे राणी बेहोषुनी
भारलों निश्चल त्वद्दर्शनीं !

By admin, 30 December, 2023

तीरावरल्या भव्य शिलेवर एकाकी बैसुनी,
हाससी काय जलीं निरखुनी ?

मंद विखुरती मेघ गुलाबी गगनीं, अवनीतलीं
गुलाबी पडली तत्सावली.
पादाप्राला चुंबुनि जातां झुळझुळणारें जल,
वाढवी कोमलता निर्मल.
तृणांकुरांवर बागडणारी बारिक पिवळीं फुलें
पहुडलीं पदराखाली पिलें.
हिरवी राई पार पसरली हासत हलते तुला,
चालल्या कानगोष्टि कोठल्या ?
पल्लवभारें तव शीरावर लवलेल्या वेलिने
कांहि ना वनराणीला उणें !

मंजुल पवनीं तरल लकेरी स्तब्ध करी पावलां,
सुचावा मार्ग कसा, जरि खुला !
सौंदर्याचें जगतावरती पसरे बघ चांदणें
राहिलें काय अता मागणें !

By admin, 30 December, 2023

माळावरच्या बांधावरती विलोलनयना जरा
यांवली कटी ठेवुनी करा.

पश्चिमभागी बाल कुणितरी देवदूत चिमुकला
चितारित मेघावलि रंगला.
नीलकाशी शुभ्र कापसी खवल्यांवर जांभळी
झाक ही हलक्या हातें दिली.
डोक्याखाली अफाट माळहि थेट पुढे लागला,
तयावर आम्रवृक्ष एकला
मोहर भरला, चूतमंजिरी उन्मादक परिमला
पसरवी लोभविण्या गे तुला.
चरतां चरतां दूर पांगल्या गाई कुरणावरी
चालल्या ओढ्याकाठुन घरी.

नजर नाचरी नागसुंदरी विलासिनी रोखुनी,
झरझरा जातांना हासुनी
गालावरच्या गोड खळीने शराब की सांडली
मुशाफिर-तृषा तिने भागली.

By admin, 30 December, 2023

शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागतां मज येतसे
न कळे उगाच रडावया.
पानांत जीं निजलीं इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे ?
निष्पर्ण झाडिंत कांपरें !

फुलली असेल तुझ्या परी,
बागेंतली बकुलावली;
वाळूत निर्झर - बासरी;
किति गोड ऊब महीतलीं !
येतील हीं उडुनी तिथे,
इवलीं सुकोमल पाखरें,
पानांत जीं निजलीं इथे.
निष्पर्ण झाडिंत कांपरें !
पुसतों सुहास, स्मरूनिया
तुज आसवें, जरि लागलें
एकेक पान गळावया
शिशिरर्तुच्या पुनरागमें.

  • admin