मस्तली इच्छेची काया । ईर्ष्या, अहंता, असूया

By admin, 29 December, 2023

मस्तली इच्छेची काया । ईर्ष्या, अहंता, असूया
बोचती, जैशा की सुया । इंजेक्शनीं ॥

इंजेक्शनें वाढे शक्ती । इंजेक्शनें जाई भीती;
इंजेक्शनें लठ्ठ होती । बुद्धि-स्नायू ॥

इंजेक्शनें पैसा मिळे । आणि पारंब्या तैशीं मुळे
रोगी-डाक्तरांचीही कुळें । पोसतात ॥

झाली इच्छा ऐशी पुष्ट । आता ओढवे अरिष्ट;
कैसे निवडावें इष्ट । उद्दिष्ट तें ॥

अंधारलें अंतर्याम । दिला जेव्हा क्लोरोफार्म;
शक्ति असूनही वर्म । निपचित ॥

अंगी कुडतें-धोतर । आणि डोक्यावरी छप्पर,
भिंतीपल्याड वावर । डाक्तरांचा ॥

संज्ञा पावे अंतर्धान । मंत्रावीण चाले यज्ञ;
सगळे धन्वंतरी प्राज्ञ । मीच रोगी ! ॥

कवितासंग्रह

  • admin