By admin, 29 December, 2023 पिचे अंधार पोकळ, गहिवर येई काळा; गालीं वाळला ओघळ, दहिवर झाले गोळा. तुझ्या भुरक्या केसांचे वळ माझ्या गालावर, माझ्या ढिल्याशा बोटांचे तळ तुझ्या स्तनावर. सोडवेना सोडवीतां गेल्या रात्रींचा हा पाश; जागा आहें तरी आता मेल्या इच्छा सावकाश. कवितासंग्रह कांही कविता १९४७