By admin, 29 December, 2023 बोंड कपाशीचें फुटे, उले वेचतांना ऊर; आज होईल का गोड माझ्या हातची भाकर ! भरे भुइमूग-दाणा, उपटतां स्तन हाले; आज येतील का मोड माझ्या वालांना चांगले ! वांगी झाली काळीं-निळीं, कांटा बोचे काढतांना; आज होतील का खुशी माणसं ग जेवतांना ! कवितासंग्रह कांही कविता १९४७