By admin, 29 December, 2023 कुठे तरी केव्हा तरी जातें असें हें चुकून, आणि तवंगतो जीव बिना रंग, बिना ऊन. मग दिसे खरी घाण : कारखान्यांतील तेल आलें होऊनी निचरा पाण्यावर टाकींतील. तेल पाण्यांत जिरावें; पाय बुडावें संज्ञेत; हें तो अशक्य अशक्य विज्ञानाच्याही भाषेत ! कवितासंग्रह कांही कविता १९४७