येशिल तेव्हा जपून ये तूं

By admin, 29 December, 2023

येशिल तेव्हा जपून ये तूं,
ठिसूळ माझ्या पहा बरगड्या;
आलिंगन तूं देतां मजला
कडकडुनी, ह्या पिचतिल निधड्या.

परंतु टाळू नको यावया
ठिसूळ माझ्या म्हणुनि बरगड्या;
हृदयामधल्या हेतूंलागी
हव्यात हाडांच्या ह्या तिरड्या !

कवितासंग्रह

  • admin