देवळांतल्या ऊद हुंगतो
गाभा भरुनी काळोखाला.
मढींत काजळ धरतो कंदिल,
आणिक कुबड्या एकांताला.
खुल्या दिलाची कंबख्ताच्या
मढ्यांत काजळ घरे भावना;
शततारांचा पुंज शोधतो
एक मनोरा हवेंतिल पुन्हा.
जाइल सळई तुझ्या कृपेची
बुब्बुळलेल्या खाचांतुनि जर,
शततारांचा पुंज हवेंतुन
खेळवीन या तळहातावर !