By admin, 29 December, 2023 सुखदुःखांचे गळे कापुनी मळे पिकवले वर्षांनी तरि, रवंथ काढी खुल्या मनाची जुनाच भाकड-कडबा हा वरि. कुडीकुडीतिल भाव लाळला आचळ धरिती पातळ आशा अधू मनाची दुडकी कुठवर- जमेल तर ही जिथवर भाषा, -आणि पांगल्या गाई जगभर गोमूत्राने पावन अंबर ! कवितासंग्रह कांही कविता १९४७