By admin, 30 December, 2023 चंद्रकिरणांनो, तुम्हां वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री हिवाळ्यात हुडहुडी ! नाही ना ? मी म्हणुनीच लांबविले मरणाला; गारठून जाल जेव्हा- चिता हवी शेगोटीला. कवितासंग्रह शिशिरागम १९३९