सचिंत पारध गोड तत्त्वतः

By admin, 30 December, 2023

सचिंत पारध गोड तत्त्वतः
सोडूनि देतों अता सुखाने !

सावज मागे, पुढे शिकारी !
गति-धुंदी की भरे शरीरीं;
नसानसांतुन वेग चढे शिरीं;
वळुनी बघणें आता कसलें !

पाय लागले डोंगरमाथां,
गतिमत्त्वाने एकतानता,
प्रभू-पावले लांब तेजतां-
अंधुक पारध तिथे संपणे

कवितासंग्रह

  • admin