सूर कशाचे वातावरणी ?

By admin, 30 December, 2023

सूर कशाचे वातावरणी ?
सळसळ पानांची ? वा झरणी
सळसळ, ओहोटीचे पाणी ?
किलबिल शिशिरी केविलवाणी ?

कुणास ठाउक ! डोळ्यां पाणी
व्यर्थं आणतां नच गाऱ्हाणी
अर्थ; हासुनी वाचा सजणी.
भास ! -जरी हो खुपल्यावाणी.

कवितासंग्रह

  • admin